राष्ट्राध्यक्षीय राजकारणाच्या इतिहासात मी एका वाईट उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत आहे. अशा उमेदवाराविरोधात निवडणूक लढवताना तुमच्यावर दबाव येतो. तुम्ही कल्पना केलीय का? या निवडणुकीत माझा पराभव झाला तर? राजकारणाच्या इतिहासात एका वाईट उमेदवाराकडून माझा पराभव झाला असेच मी आयुष्यभर म्हणत राहीन, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत.जो बायडेन यांच्याविरोधात निवडणूक हरलो, तर मला अमेरिका सोडावी लागेल, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ते जॉर्जिया माकॉन मध्ये झालेल्या प्रचारसभेत बोलत होते.
येत्या तीन नोव्हेंबरला अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. रिपब्लिकन पक्षाकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडेन निवडणूक रिंगणात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *