मुंबई /प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटात जर तुम्हालाही पैसे कमावायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. घरी बसल्या तुम्हाला २५ हजार कमवण्याची सुवर्णसंधी आहे. यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. फक्त तुमच्या एक खास प्रकारची १० रुपयांची नोट असणे गरजेचे आहे,ती असली की गॅरंटी के साथ २५ हजार तुमचे. काय आहे हा १० रुपयांच्या नोटेवर २५ हजार कमावण्याचा फंडा.

हल्ली बाजारात नव्या नोटा प्रत्येकाला पाहायला मिळतात, पण जुन्या नोटा बाजारातून गायब झाल्या आहेत. अशात जर तुमच्याकडे एक खास जुनी १० रुपयांची नोट असेल तर याची मोठी किंमत तुम्हाला मिळेल. ज्या १० रुपयांच्या नोटेविषयी आम्ही बोलत आहोत ती भारतात अनेक वर्ष चालली.पहिल्या दहा रुपयांच्या नोटांवर अशोक स्तंभ असायचा.(आताच्या नोटांवर महात्मा गांधींचे छायाचित्र आहे) समोरच्या बाजूला सम्राट अशोकाच्या अशोक स्तम्भावर असलेली तीन तोंड असलेल्या सिंहाची छबी असलेली ही जुनी नोट आता दुर्मिळ झाली आहे.त्यामुळे जुन्या वस्तूंचा संग्रह करणारे या नोटीला कीतीही पैशांत खरेदी करण्यासाठी तयार आहेत.अशा दहा रुपयांच्या एका नोटेचे तुम्हाला तब्बल २५ हजार रुपये मिळू शकतात. या नोटेची तुम्ही ऑनलाईन विक्री करू शकता.इंडियामार्ट, शॉपक्लूज आणि मरुधर आर्ट्सवर घरी बसल्या जुन्या नोटांची चागंली किंमत मिळत आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची नोट विकू शकता.१९४३ साली ब्रिटिश कालीन भारतीय रिजर्व्ह बँकेने ही नोट जारी केली होती.ज्यावर रिजर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर सी डी देशमुख यांची सही आहे.या नोटेची किंमत २५ हजार तर अशीच आणखी एक र.ना. मल्होत्रा यांची स्वाक्षरी असणारी स्वातंत्र्योत्तर काळातील १९७५ साली छापण्यात आलेली,आणखी एक दहाची नोट १५ ते २० हजार मिळवून देऊ शकते.या नोटेवरही त्रिमूर्ती सिंहाची छबी आहे