जळगाव | भाजपला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी प्रवेशांनंतर ते मोकळे पणाने आज जळगावमध्ये परतले. यावेळ खडसे यांनी एक मोठी मनातील दडपून ठेवलेली गोष्ट बोलून दाखवली.मी आणखी काही काळ जर भाजपमध्ये राहिलो असतो तर माझी अवस्था देखील वाजपेयी आणि अडवाणींसारखी झाली असती, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
खडसे म्हणाले, भाजप पक्षाविषयी माझ्या मनात भरपूर आदर आहे. मात्र भाजपामध्ये माझ्यावर खूप अन्याय सुरू होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्तींनी माझ्यावर अन्याय करत मला फार त्रास दिला.भाजपात अजून मी राहिलो असतो तर अडवाणी, अटलजींच्या बाबतीत जे झालं कदाचित तेच माझ्या बाबतीत घडलं असते. म्हणून मी पक्षांतराचा निर्णय घेतलाय. शरद पवारांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने मी त्यांचे आभार मानतो, असंही खडसे म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *