मुक्ताईनगर /प्रतिनिधी
भाजपचे मुक्ताईनगर मधील जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार की भाजपातच राहणार या बाबत अजूनही संभ्रम आणि संदीग्धदेचे वातावरण असून ‘खडसेंचे काय होणार’ ,’खडसे काय करणार’ ही चर्चा आता ‘खडसेंचे काही ठरेचीना’ इथपर्यंत येऊन ठेपली आहे.एकीकडे येत्या २२ ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे आपल्या समर्थांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणाऱ्या बातम्या येत असताना दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी मात्र मी अजून भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही,राष्ट्रवादी काँग्रेस सोबत माझी कुठलीही बोलणी झालेली नाहीत असे सांगून सस्पेन्स वाढवला आहे.
  दरम्यान आज खडसे समर्थकांनी भाजपच्या ताब्यात असलेली जळगाव महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी केली आहे.हे खडसे यांचे पक्ष सोडण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल मानले जात आहे.काल तुळजापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकांनी खडसे यांच्या बाबत काय असा प्रश्न विचारला असता,खडसे यांच्यावर भाजप कडून अन्याय झाला,मात्र ते पक्ष सोडणार का या बाबत मला कल्पना नाही.ते राष्ट्रवादीत येणार का या बाबतही आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलच अधिक प्रकाश टाकू शकतील असे पवार म्हणाले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र खडसे यांच्या पक्ष सोडण्याबाबतच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे सांगत खडसे पक्ष सोडणार नाहीत असे म्हटले आहे.माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही खडसेंच्या बंडखोरीच्या बातम्या नित्याच्या आहेत,त्यात काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे.त्यातच मराठीतील एका वृत्तवाहिनीने सूत्रांचा हवाला देत एकनाथ खडसे येत्या २२ ऑक्टोबर रोजी आपल्या काही समर्थकांसह भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केल्याने उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे.खडसे भाजप सोडतील मात्र त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे मात्र भाजपातच राहणार असल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.रक्षा खडसे या रावेरच्या खासदार आहेत.एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठवली जाण्याची शक्यता आहे.सूत्रांच्या माहितीनुसार,राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना आमदारकीसह कृषीमंत्रिपद देखील दिले जाण्याची शक्यता आहे.असे या वृत्तवाहिनीने सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *