पंढरपूर | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केलीये. पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेचा आठवले यांनी समाचार घेतलाय.पंढरपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना, एक दारुडाच दुसऱ्याला दारुडा म्हणू शकतो, असा सणसणीत टोला आठवलेंनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.आठवले पुढे म्हणाले, “राज्यात भाजप आणि रिपब्लिकन पक्षाची युती चांगली भक्कम आहे. आमच्या युतीत आम्हाला राज ठाकरेंच्या पक्षाचीगरज नाही. उलट जर ते आमच्या बरोबर आले तर आमचे मतदान कमी होईल.”दरम्यान एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले तरी त्यांच्या सोबत इतर कोणीही जाणार नाहीये. आणि जरी त्यांच्यासोबत कोणी गेलं तर त्यांना काही मिळणार नाही, असंही आठवले म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *