महाराष्ट्रात एकही मराठी भाषिक नसेल ज्याने एकदा तरी इंदुरीकर महाराजांना ऐकले नाही.पहिलेच सम – विषम च्या फॉर्मूलामुळे ते मोठ्या संकटात सापडले होते व त्यांच्या कीर्तनाच्या कमाईत मोठी घट झाली . मात्र, कोरोनानंतर इंदुरीकर महाराज यांचेही आयुष्य बदलले . निवृत्ती महाराजांचे कीर्तन मार्च महिन्यापासून बंदच आहे. इंदुरीकरांच्या एका कीर्तनासाठी ५१ हजारांपर्यंत रक्कम मोजावी लागायची. महाराज एका दिवसात किमान एक व जास्तीत जास्त तीन कीर्तन करायचे. जवळपास चार महिनांपासून कीर्तन बंद आहे. म्हणजेच, एका अंदाजानुसार इंदुरीकरांचे उत्पन्न १०० लाखांनी घटले आहे.
आता वर्षभर गाडी रुळावर नाही
सध्याची कोरोनाची स्थिती पाहता पुढे कीर्तन ठेवणे शक्य होईल की नाही, हेही कुणी सांगू शकत नाही. म्हणजेच, वर्षभर तरी कीर्तनसेवा बंदच राहणार आहे. विशेष म्हणजे, या लेखात केवळ एकट्या इंदुरीकर महाराजाचा आढावा घेतला आहे. व या मुळे बहुसंख्य कीर्तनकार बेरोजगार झाले आहेत
महाराजांवर सध्याचे संकट पाहता कुठलाच पर्याय दिसत नाही. कोरोनामुळे एकही क्षेत्र नसेल ज्यावर काहीच परिणाम झाला नाही. इंदुरीकर महाराज मार्चपासून घरीच आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *