औरंगाबाद / प्रतिनिधी
शहरात दुचाकी वाहनांची चोरी ही आता नित्याची बाब झाली आहे.काही सरावलेले सराईत,काही नवखे हौशी असे बरेच दुचाकी चोर शहरात मोक्याच्या ठिकाणी, कधी कधी घरासमोरुन देखील दुचाकी वाहनांची पळवापळवी करतात.त्यातली काही वाहने पोलीसांना मिळून येतात.काही कधीच सापडत नाहीत. पण कधी कधी यातही गमतीशीर घटना घडतात.अशीच एखाद्या विनोदी सिनेमात शोभावी अशी एक घटना औरंगाबाद शहरातील कामगार चौकात घडली.कामगार चौकात काही कामानिमित्त गेलेल्या योगेश सपकाळ यांनी आपली दुचाकी जिल्हा क्रिकेट स्टेडीयम समोर लावली.काम आटोपून येतात तो गाडी काही दिसेना.परेशान हताश होऊन ते घरी आले.आधीच कोरोना त्यात हा मोरोना. त्यामुळे ते निराश होऊन बसले.त्याच वेळी गल्लीतील एका तरुणाने चला आपण पुन्हा तिथे जाऊन पाहू असे म्हणत योगेश यांना घटनास्थळी नेले.तर काय आश्चर्य गाडी तिथे उभी होती.झाले होते असे की योगेश महाशय आपण गाडी कुठे लावली तेच विसरले होते.गाडी एकीकडे आणि पहात दुसरीकडे होते.अखेर गाडी चोरी झालीच नाही, आपल्याच वेंधळेपणामुळे घोळ झाला हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यामुळे अर्थात घरात भांड्याला भांडे लागता लागता राहिले.त्या बद्दल योगेश सपकाळ यांनी गाडी सापडून देणाऱ्या तरुणाला धन्यवाद दिले नसले तर नवलच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *