नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : देश-विदेशात कोरोनाचा कहर कायम आहे. मात्र आता हा व्हायरस आता आणखी जीवघेणा ठरत आहे. कारण आता कोरोनानं मानवी शरीरात प्रवेश करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात असे आढळले आहे की कोरोना विषाणू आता प्रोटीनच्या मदतीने शरीरात प्रवेश करत आहे. हे विशिष्ट प्रोटीन यासाठी कोरोना विषाणूला शरीरात प्रवेश देण्यासाठी मार्ग देतात. हे संशोधन सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.शास्त्रज्ञांनी संशोधनात असे नोंदवले आहे की, कोरोना विषाणूच्या बाहेरील भागात नुकीला किंवा स्पाइक रुप असते. त्याच्या बाह्य पृष्ठभागावर एक विशेष प्रोटीन म्हणजेच प्रथिने आहे जे मानवी शरीरात असलेल्या पेशींच्या प्रोटीन एसीई -2 मध्ये सामील होतो. अशा प्रकारे, कोरोना विषाणू त्या मानवी पेशीच्या आत प्रवेश करतो आणि पसरतो. हळूहळू, हा प्राणघातक विषाणू यानंतर संपूर्ण शरीराचा ताबा घेतो.या संदर्भात शास्त्रज्ञांनी दोन संशोधन केले आहे. या काळात, शास्त्रज्ञांनी मानवी पेशींमध्ये असलेल्या Neuropilin-1 नावाचे प्रोटीन शोधले. हे प्रोटीन शरीरात कोरोना विषाणूच्या रिसेप्टर प्रमाणे कार्य करते. एका संशोधनात इंग्लंडच्या ब्रिस्टल विद्यापीठाच्या संशोधकांना Neuropilin-1 Proteinच्या मदतीने शरीरात प्रवेश करणारा कोरोना विषाणू सापडला आहे.

केस गळणं हे Coronavirus चं नवं लक्षण?

केस गळणं हे देखील कोरोनाचं लक्षण असल्याचं नवीन संशोधनात पुढे आलं आहे. आतापर्यंत कोरोनाच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, खोकला यांसारखी लक्षणं आढळून येत होती. त्याचबरोबर काही जणांना श्वास घेण्यात अडचण आणि वास न येणं किंवा गंध ओळखण्यात देखील अडचण येत होती. पण आता यामध्ये केस गळणं हे देखील नवीन लक्षण आढळून येत आहे. केस गळतात म्हणून नुसती काळजी करत बसण्याऐवजी टेस्ट करणं हिताचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *