नवी दिल्ली /वृत्तसंस्था
ज्या कंपन्यात ३०० पेक्षा कमी कर्मचारी आहेत त्या कंपन्या आता कधीही,कोणतेही कारण न देता कामगार कपात करू शकणार आहेत.सरकारचा त्याला काही आक्षेप असणार नाही.कामगार संरक्षण कायद्याचीही या कामगारांना संरक्षण मिळणार नाही असा कामगारांची गळचेपी करणारा कायदा मोदी सरकारने आणला आहे .या विधेयकावरून काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी  कडाडून विरोध केला. पण केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी हे विधेयक आवाजी बहुमताने मंजूर केले आहे.यामुळे आता कोणत्याही कंपनी किंवा खासगी संस्थेला शासनाची कोणतीही परवानगी  घेतल्याशिवाय कर्मचाऱ्यांना कामावर ठेवता किंवा कामावरून काढता येऊ शकेल.हा कायदा कामगारांची गळचेपी करणारा आणि कंपनी मालकांच्या मनमानीला चालना देणारा असून आधीच बेरोजगारीची वाळवी लागलेल्या कामगार जगतासाठी ही मृत्युघंटाच असल्याचे म्हटले जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *