नवी दिल्ली / प्रतिनिधी
सदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. हे अधिवेशन 14 सप्टेंबरपासून ते 1 ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत सुमारे 17 खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. त्यामध्ये सर्वाधिक 12 भाजप खासदारांचा समावेश आहे. तर त्यामुळे संसदेचं कामकाज रोज 4 तासच चालणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांची कोरोना चाचणी बंधनकारक असल्याने सर्व खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात भाजपचे 12, काँग्रेसचे 2, शिवसेना, डीएमके आणि आरएलपी खासदारांचा समावेश आहे.दरम्यान, देशात कोरोनाचा कहर कायम आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 48 लाखांच्या पुढे गेला आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. अशातच आज (14 सप्टेंबर ) पासून संसदेचं पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यंदा अधिवेशनाचे कामकाज 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. कोरोनाच्या सावटामुळे यंदा पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहांचं अधिवेशन एकत्र पार पडत आहे.अधिवेशनाच्या कार्यकाळात कोणतेही खासदार एकमेकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी प्लास्टिकच्या सीटचाही वापर केला जात आहे. इतकंच नाही तर खासदारांना ‘अटेंडन्स रजिस्टर’ अॅपद्वारे हजेरी लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.
=============