भाजपचे नेते,माजी अर्थमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांना कोरोना
नागपूर /प्रतिनिधी
माजी मंत्री व भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनाही कोरोनाने गाठले आहे.मुनगंटीवार यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव् आला आहे. त्यानंतर मी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, अशी विनंती मुनगंटीवार यांनी केली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *