नवी दिल्ली /वृत्तसंस्था
कृषि विषयक विधेयकांवर पंजाब – हरियाणातल्या शेतकऱ्यांत पसरलेल्या असंतोषादरम्यान केंद्रातील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देणाऱ्या अकालीदल नेत्या  हरसिमरत कौर यांनी आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना साद घातली असून,लोकसभेत आणि राज्यसभेत बळजबरीने संमत करण्यात आलेली कृषि विधेयके शेतकऱ्यांना नामशेष करणारी असल्याने त्यांना संमती न देता स्वाक्षरी न करता परत पाठवावीत अशी विनंती हरसिमरत कौर यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झालेल्या या विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याला   कायद्याचे  स्वरुप प्राप्त होईल.मात्र ही बिले शेतकऱ्यांच्या नाही तर व्यापारी आणि उद्योजकांच्या हिताची असून शोषण व्यवस्थेला चालना देणारी असल्याचे हरसिमरत कौर यांनी म्हटले आहे.
 हरसिमरत कौर मोदी सरकारमध्ये अन्न-प्रक्रिया मंत्री होत्या,मात्र त्यांनी आता राजीनामा दिला आहे.काँग्रेस,तृणमूल काँग्रेस आणि अकाली दलानंतर आता १८ विरोधी पक्षांनी कृषि विषयक विधेयके परत घेण्यासाठी राष्ट्रपतींना साद घातली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *