लोकपत्र विशेष

पृथ्वी सरकारचे आरक्षण बुडाले ; – २५ जून २०१४.पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने अध्यादेश काढून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत १६ टक्के तर मुस्लिमाना ५ टक्के आरक्षण जाहीर केले.या साठी त्या सरकारने नारायण राणे समितीच्या अहवालाचा आधार घेतला होता.त्यानंतर १५ ऑक्टोबर २०१४ ला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या.१९ ऑक्टोबरला निकाल लागले आणि ३१ ऑक्टोबरला सत्तापरिवर्तन होऊन राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप-सेना युतीचे सरकार स्थापित झाले.यावेळी आघाडी सरकारने दिलेले मराठा आरक्षण कायम ठेवले जाईल.मराठा आरक्षणाला धक्का लावणार नाही अशी हमी देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.परंतु प्रत्यक्षात झाले भलतेच.फडणवीस मुख्यमंत्री झाल्या नंतर अवघ्या १३ दिवसांनी १३ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणाचे तीनतेरा वाजले.केतन तिरोडकर नावाच्या एका माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या साध्या अर्जावरून न्यायालयाने मराठा आरक्षणाला   स्थगिती देऊन टाकली.हे न्यायमूर्ती देखील आठ दिवसापूर्वीच नागपूरहून मुंबईला बदली होऊन आले होते हे विशेष.घटनाक्रम लक्षात घ्या.१९ ऑक्टोबरला विधानसभेचे निकाल लागून राज्यात सत्ता परिवर्तन होणार हे निश्चित झाले.२४ ऑक्टोबरला केतन तिरोडकरने मुंबई उच्च न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला.८ नोव्हेंबरला न्यायमूर्ती बदलले,आणि १३ नोव्हेंबरला मराठा आरक्षण खारीज झाले.
कोण हा केतन तिरोडकर ? त्याचा बोलविता धनी कोण ? काय त्याची पोटदुखी ? याचा ना कोणी तपास काढला ना मागमूस.
==================

फडणवीस सरकारची गाजराची पुंगी

आघाडी सरकारने दिलेले आरक्षण बुडाल्या नंतर फडणवीस सरकार मजेत राजकारभार करू लागले होते.मराठा आरक्षणाचा मुद्दा आपल्याही अजेंड्यात आहे आणि मराठा समाजाचे आपणही काही देणे लागतो हेच हे सरकार विसरले होते.सरकार खडबडून जागे झाले ते मराठा मोर्चामुळे.१३ जुलै २०१६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी या खेडेगावात एका अल्पवयीन मराठा शालेय विद्यार्थिनींची त्याच गावातल्या तीन दलित तरुणांनी बलात्कार करून हत्त्या केली.या घटनेतील आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभर मराठा समाजाचे मोठमोठे जवळपास ५७ मोर्चे निघाले.याच मोर्च्याच्या निमित्ताने विविध मराठा संघटना एकत्र आल्या आणि मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा पुढे आली.मराठा समाजाचे हे विराट रूप पाहून फडणवीस सरकार हादरले आणि त्यांनी हा विषय सामाजिक न्याय विभागाकडे सोपवून पुन्हा अहवाल मागवून १८ नोव्हेंबर २०१८ रोजी मराठा समाजाला पुन्हा १६ टक्के आरक्षण दिले.इथे जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते ही दोन नवीन पात्रे समोर आली.आडनावे वेगळाले असले तरी हे दोघे पतिपत्नी आहेत.त्यांनी पहिल्यांदा मुंबई उच्च न्यायालयात याचिका टाकली.तिथे २७ जून २०१९ रोजी आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही पण १६ टक्के आरक्षण १३ टक्क्यावर आले.नंतर हे दाम्पत्य सुप्रीम कोर्टात गेले.तिथे काय झाले हे आपल्या पुढे आहे.प्रश्न उरतो हा की कोण हा गुणरत्न सदावर्ते,कोण जयश्री पाटील.मराठा आरक्षणाबद्दल त्यांना काय आहे पोटदुखी ? 
  गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील.मुंबईतील लोअर परेल भागात राहणारे हे व्यवसायाने वकील दाम्पत्य.२०१४च्या आघाडी सरकारच्या मराठा आरक्षण निर्णयाला  न्यायालयात आव्हान देणारे डॉ. एल. के. पाटील यांच्या जयश्री या कन्या आहेत.बापाने आघाडीच्या तर लेकीने युतीच्या आरक्षणाला बुडवले असे या बाबतीत म्हणता येईल.असो गुणरत्न सदावर्तेकडे वळू.ॲडव्होकेट सदावर्ते हे मुळचे नांदेडचे आहेत. त्यांचे शिक्षण औरंगाबाद आणि मुंबईत झाले. ते विविध दलित चळवळींत आधीपासूनच सक्रिय होते. नांदेडला ते ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ही त्यांची स्वतःची संघटना चालवायचे.ते एमबीबीएस असल्याने वकिली अगोदर त्यांनी काहीकाळ औरंगाबादेत वैद्यकीय व्यवसाय देखील केला.सदावर्ते यांचे वडील प्रकाश आंबेडकर यांच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाकडून एकवेळ नांदेड महापालिकेवर नगरसेवक म्हणूनही निवडून गेले होते.
—————————–
सुपर झेन !

झेन गुणरत्न सदावर्ते.

नोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबईतल्या परळ भागातील क्रिस्टल टॉवर नावाच्या रेस्टोरंटला लागलेल्या आगीत होरपळून तीन जणांचा मृत्यू झाला होता,यावेळी समोरच्या इमारतीत राहणाऱ्या सातवीत शिकणाऱ्या (तेव्हा) झेन सदावर्ते हिने दाखवलेल्या तत्परता आणि सावधगिरी बद्दल २६ जानेवारी २०१९ रोजी तिला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात आला.या पुरस्कारासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने तिची विशेष शिफारीश केली होती.इतकेच नाही तर सध्याचे सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीश शरद बोबडे यांनी देखील झेन सदावर्ते हिची शिफारीश केली होती.न्यायमूर्ती बोबडे तेव्हा नागपूर खंडपीठात न्यायाधीश होते.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *