कन्नड / कल्याण पाटील       कन्नड शहरात सुरू असलेले शिवभोजन शहरातील,तालुक्यातील नागरिकांच्या नजरेस पडत नसताना कुठे शिवभोजन मिळते याचा ठावठिकाणा नसताना लाखोंचे बिले बळकावनाऱ्या या शिवभोजनाचे दै लोकपत्र ने दखल घेताच शहरातील दुमजली इमारतीवर तात्काळ फलक झळकावून सर्व काही आलबेल आहे असे दर्शविणाऱ्या या शिवभोजन केंद्राच्या चौकशीचे आदेश आता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले असल्याने यात शिवभोजन केंद्रात समाविष्ट पूर्ण यंत्रणा हादरून गेली आहे.कारण शिवभोजन सुरू होते हेच नागरिकांना सर्वसामान्यांना माहीत नव्हते मग इतक्या थाळ्या आणि लाखोंची बिले आलीच कशी,आली तर शासकीय यंत्रणा अधिकारी काय करत होते? लॉकडाऊन  मध्ये इतके नागरिक येथे जात होते मग त्यांची ठिकठिकाणी पोलीसांर्फत चौकशी केली जात नव्हती काय? जर कडकडीत लॉक डाऊन होते आणि ठिकठिकाणी कडक चौकशी केली जात होती मग अशी आकडेवारी आलीच कशी हे प्रश्न उपस्थीत तर होतच आहे शिवाय स्थानिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बाबत मौन पाळले असल्याचे चित्र दिसत आहे .या बाबत ते काहीच प्रतिक्रिया देत का नाहीत? कोणत्याही कर्मचाऱ्यांना बोलू दिले जात नाही.       शिवभोजन थाळी सर्वसामान्यांना दहा रुपयांत मिळते तर शिवभोजन चालकास राज्य सरकार एका थाळीमागे 45 रुपये देते म्हणजेच शिवभोजन चालकाला एका थाळी चे 55 रुपये मिळतात . कन्नड शहरातील शिवभोजन चालकाने एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये 17 हजार 691 थाळी विक्री केल्या असल्याचे नोंद केली असल्याने चार महिन्यांत 45 रुपयांप्रमाणे एकूण 7 लक्ष 96 हजार 95 रुपये शासनाने खर्ची घातले आहे.  मुळात शिवभोजन केंद्र कुठे पाहिजे ? इतक्या दिवस हे शिवभोजन केंद्र कुठे होते ? दैनिक लोकपत्र ने वृत्त प्रसिद्ध करतांच दुमजली इमारतीवर बोर्ड कसा लागला ? भुकेने व्याकूळ अंध व अपंग व्यक्ती शिवभोजसाठी दुमजली इमारतीवर कसे जातील ? शासनाने ठरवून दिलेल्या नियमा प्रमाणे शिवभोजन केद्राचा बोर्ड आहे का ? शिवभोजन केंद्रास एका महिन्यात कोणत्या महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली ? शिवभोजन केंद्रातील व्हिजींट रजिस्टर कोणत्या अधिकाऱ्यांनीकाय अभिप्राय लिहीला ? शिवभोजन केंद्रात कोणकोणत्या व्यक्तीचे फोटो अपलोड करण्यात आले ? फोटो अपलोड करण्यासाठी कोणत्या मुलांस दोन रुपये फोटो प्रमाणे काम सांगण्यात आले होते? ज्यांची नोंद केली त्यांनी शिवभोजन घेतले काय?जिल्हाधिकारी कन्नड दौऱ्यावर आले असताना त्यांना शिवभोजन केंद्र का दाखविण्यात आले नाही? त्याचवेळी पत्रकार व जिल्हाधिकारी यांची भेट होऊ दिली नाही.शिवभोजनच्या घोटाळ्याचा पाढा पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना वाचून दाखविण्याच्या भीतीपोटीच जिल्हाधिकारी यांचा दौरा पत्रकारांपासून दडवून ठेवला होता काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनातील अधिकाऱ्यांना तालुक्यातील जनतेला दयावी लागणार आहेत.  मात्र  बोगस नावे टाकून हजारो माणसे जेवण करून गेली असे दाखविले असल्याने या प्रकरणाच्या चौकशी चे आदेश दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने आता काय चौकशी होते  याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *