पैठण / प्रतिनिधी घारेगाव येथे नेहमीच वीजपुरवठा खंडीत होतो याकडे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. नेहमीच्या खंडीत वीज पुरवठयामूळे नागरीक चांगले वैतागून गेले आहे.त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी घारेगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
घारेगाव येथील डीपी चे काम अगदी थातुरमातुर केले जात असुन अर्ध्या गावात लाईट असते आणि अर्धे गाव अंधारात कसे गावात लाईट खंडित होतो हे नेमके कशामुळे होते.याची पाहणी करून विज खंडित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मात्र असे न करता थोडेफार काम करतात आणि निघून जातात पुन्हा तशाच तसे याबाबत अनेक वेळा ग्रामस्थांनी संबंधीत अधिकारी यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या परंतु तक्रारीचा संबंधीत अधिकार्यांवर काडीमात्र ही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे.घारेगाव येथील जि.प.शाळेजवळील डिपी ना दुरुस्त असुन एक दिवस आड लाईट असते तर आता गेल्या चार दिवसांपासून घारेगाव अंधारात आहे.हा प्रकार जवळपास दोन महिन्यांपासून सुरू आहे.कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत आहेत.त्यामुळे काम पुर्ण होण्यास वेळ लागत आहे.संबंधीत अधिकारी हे देखील या प्रकाराकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत आहेत.घारेगाव येथील वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने घारेगाव येथील अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या आहे.चार दिवसापासून पैठण तालुक्यातील घारेगाव अंधारात, नागरीक त्रस्त झाले आहेत.महावितरण विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला असुन घारेगाव येथिल विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *