संसदेत सरकारची कबुली
———————-
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असले तरी त्यात प्रश्नोत्तरांचा तास नसल्याने मंत्र्यांकडून सदस्यांच्या प्रश्नांना फक्त लेखी उत्तरे देण्यात येत आहेत.यातच केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून २०१५ ते २०२० या कालावधीत बॅंक घोटाळ्यातील ३८ आरोपी देशाबाहेर पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआय ज्या बॅंक घोटाळ्यांचा तपास करत आहेत त्यातील हे आरोपी आहेत. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी ही माहिती दिली.देशातल्या विविध बँकांमधील आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणातील ३८ आरोपी १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान देशातून पळून गेले आहेत, असे अनुराग ठाकुर यांनी सांगितले आहे.ईडीने २० आरोपींच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जाहीर करण्यासाठी इंटरपोलकडे विनंती केली आहे. १४ आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी विविध देशात अर्ज करण्यात आले आहेत. फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, २०१८ नुसार ११ लोकांविरुद्ध कारवाईसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र फसवणुक करणाऱ्यांनी किती घोटाळा केला आहे याची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.बॅंक घोटाळ्यातील आरोपींमध्ये ९००० कोटींचा घोटाळा करणारा विजय माल्या, १२,००० करोडचा बॅंक घोटाळा करणारा मेहुल चोक्सी तसेच पंजाब नॅशनल बँकमध्ये १४ हजार कोटींचा घोटाळा करून लंडनमध्ये पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या परिवारातील  सनी कालरा आणि  विनय मित्तल यांचा समावेश आहे. 
========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *