नवीदिल्ली /वृत्तसंस्था
कृषी विधेयकावरून देशात वादंग माजलेले असताना मोदी सरकारने शेतकऱ्यासंबंधी आज आणखी एक धक्का दायक निर्णय घेतला असून रब्बी हंगामातील पिकासाठी केंद्रसरकारने आज हमीभाव घोषित केले.मोदी सरकारने घोषित केलेले हे हमीभाव शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा असून धान्य भरण्यासाठी लागणाऱ्या थैल्यांच्या किमती इतकी सुद्धा वाढ हमीभावात करण्यात आलेली नाही.केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली. मुख्य ६ पिकांसाठी ही वाढ करण्यात आली आहे.गहू,चना,हरबरा, करडई यासह ६ पिकांच्या हमीभाव किंमतींमध्ये अत्यंत नगण्य वाढ करण्यात आली आहे.
 केंद्र सरकारने गव्हामध्ये ५० रुपये प्रतिक्विंटल,ज्वारीमध्ये ७० रुपये प्रतिक्विंटल,मोहरीला २५ रुपये प्रतिक्विंटल,हरभरा ३० रुपये प्रतिक्विंटल,करडी १५ रुपये तर मसूर २० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव वाढ केली आहे.ही वाढ आहे की थट्टा,यात थैल्या तरी येतील का ? असा सवाल विरोधकांनी विचारला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *