नवी दिल्ली /वृत्तसंस्था
राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या आठ खासदारांचे निलंबन रद्द करावे आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे कृषिविधेयक तात्काळ मागे घेण्यात यावे या मागणीसाठी आज विरोधकांनी संसदेसमोर कालपासून सुरु केलेले अन्नत्याग आंदोलन आजही सुरूच होते,दरम्यान सभापतींनी पाठवलेला दिलगिरी व्यक्त केल्यास निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळला.विरोधकांनी राज्यसभेच्या कामकाजावरही बहिष्कार टाकला आहे.राज्यसभा खासदारांनी सोमवारपासून संसद परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर सुरु केलेले अन्नत्याग आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे.खासदारांचं निलंबन रद्द होईपर्यंत राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय देशील सर्व विरोधी पक्षांनी घेतला आहे.
राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, डीएमके, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, वामदल, आरजेडी, टीआरएस आणि बीएसपी या पक्षांनी घेतला आहे.सदनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे  राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.दरम्यान पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी २५ सप्टेंबरला शेतकरी कर्फ्यूचे आवाहन केले. राजस्थानचे शेतकरी त्याबाबतचा निर्णय २३ सप्टेंबरला घेतील.मात्र राज्यात विरोध म्हणून सोमवारी सर्व २४७ कृषी बाजार बंद ठेवण्यात आले.तर सरकारने मंगळवारी कृषीशी संबंधित तिसरे विधेयक आवश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक देखील मंजूर करून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *