मनाली /वृत्तसंस्था
भाजपने दिलेली स्क्रिप्ट आणि ठरवलेल्या मानधनावर मुंबईत ‘तमाशा’ करून कंगणा राणावत पुन्हा कुलू मनालीची थंड हवा खायला गेली आहे,पण तिचे भडकलेले डोके मात्र अजून शांत झालेले दिसत नाही.ट्विटरवरून तिची टिवटिव सुरूच आहे.सुशांत प्रकरणावरून बॉलिवूडची होत असलेली बदनामी थांबवा असे संसदेत कळकळीचे आवाहन करणाऱ्या खासदार जया बच्चन यांच्यावरही कंगणाने आगपाखड केली असून ‘तुमची मुलगी श्वेताला कोणी किशोर वयात ड्रग दिले असते,तिचे लैंगिक शोषण केले असते,तिची बदनामी केली असती,तुमचा मुलगा अभिषेक याला कोणी ब्लॅक मेल केले असते.त्याचा मानसिक छळ केला असता,लुटले असते,त्याला ड्रगच्या व्यसनात डुबवले असते,आणि एक दिवस तो सुशांत सारखा फासावर लटकला असता तरी तुम्ही असेच म्हणाला असतात का ? फिल्म इंड्रस्टीत काय काय चालते ते माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती आहे,तुम्ही खरे बोलत नाही.मला पाठिंबा देण्या ऐवजी मलाच बदनाम करू पाहात आहेत.मी बोलते आहे,आपण निदान गप्प तरी बसा’ असे ट्विट कंगनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *