मुंबई /प्रतिनिधी
सुशांतसिंह राजपूत आत्महत्त्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार असेल तर हरकत असण्याचे काही कारण नाही.राज्य सरकार आणि राज्य पोलीस सीबीआयला योग्य ते सहकार्य करेल.मात्र या तपासाची परिणीती डॉ.दाभोलकर हत्त्या प्रकरणाच्या तपासाप्रमाणे होऊ नये इतकेच आमचे म्हणणे आहे असे खोचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.डॉ.दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी हत्त्या झाली होती.या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे.मात्र सात वर्ष उलटून गेली तरी सीबीआय अजून कोणत्याच निष्कर्षाप्रत पोहचलेली नाही.सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही सीबीआयचा तपास असा कासवगतीत अडकून भलत्या दिशेने भरकटू नये अशी अपेक्षा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *