देशातील तरुणांसाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार यापुढे  सरकारी नोकरीसाठी देशभरात एकच परीक्षा होणार आहे. केंद्र सरकारने रेल्वे, बँका आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या द्वारे स्वतंत्र घेतल्या जाणाऱ्या परीक्षा थांबवून त्याऐवजी राष्ट्रीय भरती संस्थेद्वारे संयुक्त पात्रता चाचणी घ्यायचे ठरवले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांकडून ही मागणी होत होती पण सरकार  कडून याबाबत चालढकलच केली जात होती तरुणांनी ही मागणी सातत्याने लावून धरल्याने  ही मागणी मान्य करण्याचे सूतोवाच केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केले होते. अखेर मंत्रिमंडळाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याने त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.   कारण आतापर्यंत सरकारी नोकरी आणि पब्लिक सेक्टर बँकेमधील पदांच्या परीक्षा देण्यासाठी तरुणांची भलतीच धावपळ होत होती. २० भरती एजेंसी देशात आहेत, म्हणून विविध  ठिकाणी प्रत्येक एजेंसीच्या परीक्षा देण्यासाठी तरुणांना जावे लागे. या परीक्षेसाठी तरुणांना वेगवेळ्या दिवशी, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे वेगवेगळे क्लास लावावे लागत, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे  शुल्क भरावे लागत,  या निर्णयामुळे तरुणांचा वेळेचा अपव्यय, दुसऱ्या गावी परीक्षेसाठीचा प्रवास, तिथे राहणे त्यासाठीचा खर्च, खिशाला  पडणारा भुर्दंड हे सर्व थांबेल. या निर्णयाने तरुणांची दगदग थांबेल त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्यही ठीक राहील.  या निर्णयाचा सर्वात जास्त फायदा दिव्यांग व महिला उमेदवारांना होणार आहे परीक्षेसाठी त्यांची होणारी फरफट थांबेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. त्यांना आता परीक्षा देण्यासाठी परजिल्ह्यात जावे लागणार नाही.  निर्णयामुळे सरकारी यंत्रणेवरील ताण आणि आर्थिक भार कमी होऊन सरकारी नोकर भरतीसाठी होणाऱ्या परीक्षांमध्ये एकवाक्यता निर्माण होईल शिवाय भरती प्रक्रियेमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारालाही आळा बसेल. या निर्णयाचा देशातील कोट्यवधी तरुणांना लाभ होणार आहे. आज देशात २० ते ३० वयोगटातील कोट्यवधी तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. हाती डिग्री असूनही त्यांना नोकरी पासून  वंचित राहावे लागत आहे. या निर्णयाचा लाभ या कोट्यवधी तरुणांना होणार आहे. केंद्र सरकारच्या या दूरदर्शी निर्णयाचा दूरगामी परिणाम होणार आहे.श्याम बसप्पा ठाणेदार दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

4 thought on “भरतीसाठी सामाईक परीक्षा; केंद्र सरकारचा स्वागतार्ह निर्णय”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *