हमीभाव नाहीच : आधारभूत किंमतही नाही 

हमीभाव नाहीच : आधारभूत किंमतही नाही
मूग,उडीद,सोयाबीन,सूर्यफूल खरेदीत अडत्यांकडून शेतकऱ्यांची लूट

औरंगाबाद /प्रतिनिधी-
खरीप हंगामात शेतकर्‍यांनी उत्पादित केलेले मूग, उडीद बाजार समितीत विक्रीसाठी दाखल होत आहे. बाजार समितीमधील अडत्यांनी मात्र हमीभाव धाब्यावर बसवून शेतकर्‍यांची लुटच लूट सुरु केली आहे. विशेष म्हणजे खरेदी केंद्र सुरू न करता हा प्रकार उघडपणे होत असतानाही जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मात्र ‘हाताची घडी अन् तोंडावर बोट’ ठेवण्याची भूमिका घेतल्याने शेतकर्‍यांतून संताप व्यक्‍त होत आहे.

सोयाबीनसाठी राज्य शासनाने तीन हजार चारशे रुपये हमीभाव निश्‍चित केला आहे. मात्र असे असूनही आडात व्यापारी केवळ  अडीच ते तीन हजार  रुपये दराने सोयाबीन खरेदी करत आहेत . त्यामुळेच यावर्षी सोयाबीनचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक होत  असून राज्य शासनाने यासाठी राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये सोयाबीनसह कडधान्य हमीभाव खरेदी केंद्रांची तातडीने सुरुवात  केली पाहिजे, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केली आहे.यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीनसह कडधान्य उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. उत्पादन वाढल्यास पिकांचे दर कमी होतात हा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी सोयाबीनचा शासनाकडून जाहीर करण्यात आलेला हमीभाव आणि आजचा प्रत्यक्षातील दर यात आत्ताच पाचशे ते आठशे  रुपयांची तफावत असल्याचे ते म्हणाले. सूर्यफुलसाठी सरकारने ५  हजार ३८८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकर्‍यांना कमाल साडेतीन हजार रुपयांपर्यंत भाव बाजारात देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे या पिकातही सुमारे दोन हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.

जसा कालावधी जातो, तसतसा सोयाबीन तसेच कडधान्यांचे दर कमी होतात, हा शेतकऱ्यांचा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळेच राज्य शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक आणि त्यांची लुट थांबण्यासाठी  राज्यातील प्रत्येक तालुक्यात सोयाबीन तसेच कडधान्य खरेदीसाठी आम्ही भाव केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी शासनाची उदासिनता कायम असून शासनाने प्रत्येक तालुक्यात हमीभाव केंद्र सुरू करावे, या मागणीचे निवेदन आम्ही मी,मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना    दिले आहे. आमच्या मागणीनुसार शासनाने २५  तारखेपर्यंत हमीभाव केंद्रे सुरू करावीत,  अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना २५  सप्टेंबरपासून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *