सोशल मीडियावर प्रेम शोधणारे लोक नेहमीच करतात या चुका !

 

बदलत्या जमान्यासोबत लोकांचा मेत्रीचा प्रकार बदलला आहे. अलिकडे लोक रिअल लाइफपेक्षा व्हर्चुअल जीवनात व्हर्चुअल मित्रांसोबत मैत्री करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करण्याची शर्यत सध्या लागली आहे. एकटेपणामुळे अनेकजण सोशल मीडियातच प्रेमाचा शोध घेत आहेत. या माध्यमातून तुम्हाला प्रेम किंवा पार्टनर मिळेलही. पण काही लोक नवीन मित्र किंवा नातं सोशल मीडियात शोघतांना काही चुका करतात. आणि या चुकाच त्यांना महागात पडतात.

आपण अनेकदा ऐकत असतो की, सोशल मीडियात आधी मैत्री, नंतर भेटीगाठी त्यानंतर प्रेम आणि मग फसवणूक होते. अशात अनेकांचं मन दुखावलं तर जातंच पण सोबतच आर्थिक फसवणूकही होते. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे.

१) समोरच्या व्यक्तीवर इम्प्रेस होऊ लगेच आपल्या पर्सनल गोष्टी शेअर करु नका. जसे की, घरचा पत्ता, फोन नंबर इत्यादी.

२) तुमच्या मैत्रीला नुकतीच सुरुवात झाली असेल तर सीमा ठेवून बोला. पुढे जाऊन समोरचा व्यक्ती तुमच्या मेसेजचा गैरफायदा घेऊ शकतो.

३) जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीबाबत पूर्णपणे जाणून घेत नाहीत तोपर्यंत आपली पर्सनल फोटो शेअर करु नका.

४) ऑनलाइन डेटिंगमधून तयार झालेलं नातं जास्त सिरिअस घेऊ नका. कारण ती तुमची खरी दुनिया नाहीये.

५) जेव्हाही भेटाल तेव्हा सार्वजनिक जागांवर भेटा. पहिल्या भेटीवेळी तुम्ही तुमच्या मित्राला सोबत घेऊन गेल्यास कधीही चांगले.

६) अनेकदा मुलींचं कौतुक केलं की, त्या त्याचे हॉट आणि सेक्सी फोटो मुलांना पाठवतात. पण हे चुकीचं आहे काही मुलं याचा दुरुपयोग करु शकतात.

ब्लाईंड डेटआधी या गोष्टींची घ्या काळजी

१) ब्लाइंड डेटला जाण्याआधी त्याबाबत कुणाकडून तरी माहिती घ्या.

२) ब्लाइंड डेटला जाण्याआधी तुमच्या एखाद्या विश्वसनीय व्यक्तीला सांगून जा आणि सतत त्याच्या संपर्कात रहा.

३) पहिल्या भेटीत ड्रिंक अजिबात करु नये. याने तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

४) कोणत्याही माहीत नसलेल्या किंवा निर्मनुष्य ठिकाणावर भेटायला जाऊ नका. सार्वजनिक ठिकाणी भेटा.

५) ब्लाइंड डेट ही फार जास्त वेळेची नसावी. कमीत कमी वेळ भेटावे.

६) आपल्याबाबत सगळंकाही सांगू नका. काही गोष्टी या न सांगितलेल्या बऱ्या.

७) प्रत्येक गोष्ट मान्य करु नका, आधी तो व्यक्ती कसा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *