सर्व शिक्षा अभियाना’च्या पुस्तकातील रामदास चरित्रात छत्रपती संभाजी महाराजाबाबत वादग्रस्त उल्लेख

नागपूरच्या ‘लाखे’ प्रकाशनाचे ‘दक्ष’ संशोधन

डॉ.शुभा साठे नामक विदुषींचा ‘बौद्धिक’ प्रताप

म्हणे
संभाजी दारूच्या कैफात कलुषाच्या जाळ्यात अडकला होता.रामदासाने उपदेशाचे पत्र
पाठवल्यानंतर संभाजीला उपरती होऊन त्याने चांगले वागण्याची हमी दिली

पुणे / प्रतिनिधी 


राज्याच्या शालेय शिक्षण विभागा मार्फत पूरक शिक्षण म्हणून प्रकाशित होणाऱ्या  सर्व शिक्षा अभियानातील ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख या पुस्तकात केल्याचे समोर आले आहे.
  शालेय शिक्षण विभागा मार्फत  सर्व शिक्षा अभियानात विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि त्याच्या ज्ञानात भर पडावी या साठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पूरक पुस्तके प्रकाशित करण्यात येतात.पूर्वी हे काम बालभारती मार्फत करण्यात येत असे.मात्र आता हे काम खाजगी प्रकाशनांना देण्यात येत आहे.त्यामुळे या पुस्तकांचा मजकूर आणि विषय निवडीवर शिक्षण विभागाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्याचाच फायदा घेऊन ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकाचा सर्व शिक्षा अभियानाच्या पूरक पुस्तकात समावेश झाला असून हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केले आहे. या पुस्तकातील पान क्रमांक १८ वर संभाजी महाराजांविषयी उल्लेख आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा उल्लेख या पुस्तकात आहे.संभाजी महाराज दारुच्या कैफात होते, या वाक्यावर आक्षेप घेतला गेला आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात कुठलाही पुरावा नसताना  छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली, असा आरोप  केला आहे. हा निव्वळ करंटेपणा असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. असा भयंकर मजकूर शालेय प्राथमिक पुस्तकात छापला जातो हे राज्य सरकारचे दुर्दैव आहे, असेही तक्रारकर्त्यानी  म्हटले आहे.  या वादासंदर्भात या पुस्तकाच्या प्रकाशिका संध्या लाखे यांच्याशी दैनिक लोकपत्रने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो होऊ शकला नाही.नागपूरच्या लाखे प्रकाशनचे संचालक आणि लेखिका शुभा साठे हे दोघेही रा स्व संघाशी संबंधित असून त्याच ‘बौद्धिक’विकृतीतून हा प्रकार घडला असल्याचे तक्रार कर्त्यांनी म्हटले आहे.
Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *