‘सनातन’ संशयाच्या भोवऱ्यात

 

नालासोपाऱ्यात देशी बॉम्ब सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला वैभव राऊत हा सनातन संघटनेचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होतोय. पण सनातनच्या साधकांवर अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. मालेगाव बॉम्बस्फोट आणि विवेकवादी विचारवंतांच्या हत्येच्या कटांचे आरोपही सनातनच्या सधकांवर झाले आहेत. नालासोपारा देशी बॉम्ब प्रकरणी वैभव राऊतला अटक झाल्याने संशयाची सुई पुन्हा एकदा सतानन या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेकडे वळलीय. अटक करण्यात आलेला आरोपी वैभव राऊत हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातंय. त्याच्याकडून पोलिसांनी 8 देशी बॉम्बसह इतरही घातक सामुग्री हस्तगत केली आहे. पण सनातन संघटनेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी मात्र, त्याच्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. हा पोलीसांचाच कट असल्याचा आरोप त्यांनी केला.

Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *