सनातनच्या नादी लागून पोरगा हिंदू दहशतवादी ! वयोवृद्ध  बापाने सोडला जीव 

दाभोलकर हत्त्या आणि नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटक
करण्यात आलेल्या  गणेश कपाळेच्या वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू

 जालना /प्रतिनिधी –

नरेंद्र दाभोलकर हत्त्या आणि नालासोपारा स्फोटकांप्रकरणी गणेश कपाळेला अटक करण्यात आल्यामुळे त्याचे वडील मधूकर बाबूराव कपाळे यांना हा धक्का सहन झाली नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ते ६८ वर्षाचे होते.नालासोपारा स्फोटकप्रकरण आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी जालना येथे झेरॉक्सचे दुकान चालवणाऱ्या गणेश कपाळेला अटक करण्यात आली आहे . या आधी एटीएसने जालन्यातून श्रीकांत पांगारकर आणि खुशालसिंग राजपूत याला  अटक करण्यात आली आहे . पांगरकरने सनातन संस्थेकडून देण्यात आलेली काही निवेदने कंपोज करून घेण्यासाठी गणेशच्या दुकानाचा वापर केला होता आणि याच संशयाने एटीएसने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे . सनातनच्या नादी लागून पोरगा हिंदू दहशतवादी झालेला पाहून हा धक्का त्याच्या वडिलांना सहन झाला नाही. तब्येत बिघडल्याने गुरुवारी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये ते सेवक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *