मोदी सरकारमधील रंगेल मंत्री अकबर यांची गच्छन्ति 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातले परराष्ट्र राज्य  मंत्री एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाल्यामुळे  त्यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांपाठोपाठ आता मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही आग्रही भूमिका घेतली आहे.  पंतप्रधान मोदी यांनी फ्रांस दौऱ्यावर असलेल्या अकबर याना तातडीने परत बोलावले असून कदाचित उद्या मोदी त्यांना राजीनामा द्यायला सांगू शकतात. असा अंदाज विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केला.
#MeToo या मोहिमेत अकबर यांच्यावर तब्बल सहा महिला पत्रकारांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. आरोप करणाऱ्या सर्व पत्रकार महिला प्रतिष्ठीत वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या आहेत. अकबर हे या वृत्तपत्राचे संपादक असतानाच्या त्या सर्व घटना आहेत.
      अकबर हे ‘द टेलिग्राफ’, ‘एशियन एज’ आणि ‘द संडे गार्डियन’ या वृत्तपत्रांचे संपादक होते. सध्या ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. संपादक असतानाच्या कार्यकाळात नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलेल्या आणि त्यांच्या काही महिला सहकाऱ्यांनीच त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.
हॉटेलच्या खोलीत बोलावून अश्लिल संभाषण करणे , मद्य पिण्यासाठी आग्रह करणे , आक्षेपार्ह शेरेबाजी करणे असे अनेक आरोप एम.जे. अकबर यांच्यावर लावण्यात आले आहेत.
Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *