पेट्रोल-डिझेलनंतर वीजदरवाढ 

मुंबई /प्रतिनिधी –
पेट्रोल-डिझेलच्या भडक्यात होरपळणाऱ्या महाराष्ट्रतल्या जनतेला आता  वीजदरवाढीचा शॉक बसला आहे. राज्यातल्या घरगुती आणि कृषी वापरासाठीची वीज ४ टक्क्यांनी महाग झाली आहे. १ सप्टेंबरपासून राज्यात नवे दर लागू झाले असल्याची घोषणा  ऊर्जामंत्री चंद्रशेखऱ बानवकुळे यांनी आज नागपुरात केली. राज्यातल्या वीज वितरण कंपनीकडे एकूण ३४ हजार ६४६ कोटी तूट आहे. त्यापैकी २० हजार ६५१ कोटी रुपय़े भरून काढण्याची परवानगी वीज नियामक आयोगाने  दिली आहे. त्यामुळे हि दरवाढ अपरिहार्य असल्याचे बावनकुळे म्हणाले.कृषी विजेवर ६ टक्के,वाणिज्य विजेवर ४ टक्के तर उद्योग विजेवर २ टक्के दरवाढ करण्यात आली आहे .यंदा तीन ते पाच टक्के वीजदर वाढ करण्याची परवानगी मिळाली आहे. तर पुढच्यावर्षी चार ते सहा टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. १ सप्टेंबरला लागू झालेल्या नव्या दरपत्रकानुसार आता शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर करणाऱ्या ग्राहकांच्या वीज दरात युनिट मागे २४ पैसे वाढवण्यात आले आहेत.पेट्रोल डिझेल पाठोपाठ विजेच्या दारात वाढ झाल्यामुळे सामान्य जनतेला फटका बसणार आहेच,सोबत महागाई आणखी वाढणार अशी चिन्हे आहेत.एन सणासुदीच्या दिवसातच वीजदरवाढ झाल्यामुळे सामान्य जनतेचे मात्र कंबर मोडणार आहे.

Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *