‘पंतप्रधान मोदी भ्रष्टाचारी ‘:राहुल गांधीं

नरेंद्र मोदींवरही कारवाई झाली पाहिजे


लोकपत्र ऑनलाईन :


राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर पुन्हा टीका केली आहे . राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान मोदी याना अनेक सवाल केले आहेत . डसॉल्ट कंपनीच्या सीईओच्या विधानाचा हवाला देऊन भाजप करत असलेला कांगावा कसा खोटा आहे हे दाखवून दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी आहेत, अशा शब्दात राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे . संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आताच फ्रान्स दौऱ्यावर का गेल्या आहेत, पंतप्रधान मोदी का गप्प बसलेत असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले. नवी दिल्लीमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.डसॉल्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. राफेल प्रकरणात नरेंद्र मोदींकडून अनिल अंबानी यांना 30 हजार कोटींची नुकसान भरपाई मिळाली आहे. तर ही कोणत्या गोष्टीची नुकसान भरपाई दिली असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे.पंतप्रधानांनी अनिल अंबानी यांच्या खिशात ३० हजार कोटी टाकले, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे . तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कारवाई झालीच पाहिजे असेही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे .

 

Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *