पंतप्रधान मोदींनी नितीन गडकरींनची कानउघडणी केली

लोकपत्र ऑनलाईन :


नितीन गडकरी यांनी एका ‘टीव्ही शो’मध्ये बिनधास्तपणे सांगून टाकले ‘२०१४ च्या लोकसभा निवडणुकी वेळी ‘फेकमफाक’ करा, असा सल्ला वरिष्ठांनीच आम्हाला दिला होता. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पक्षात खूपच अडचणीत आले आहेत.गडकरींना मुलाखत चांगलीच भोवली आहे . त्या मुलाखतीवरून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फैलावर घेतले आहे . तसेच या मुलाखतीच्या वेळी वादग्रस्त नाना पाटेकर ही
त्या वेळी उपस्थित होते . म्हणून अजूनच प्रकरण चिघळले आहे .

परंतु या व्हिडिओत काय म्हणाले होते गडकरी…
आम्ही सत्तेत येण्याची सूतराम शक्यता नव्हती. त्यामुळेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकी वेळी आम्ही वाट्टेल तशी आश्वासने दिली. किंबहुना बेलगाम आश्वासने द्या, असा सल्लाच आम्हाला वरिष्ठांनी दिला होता. प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख जमा करू, हे आश्वासन त्यापैकीच एक होते, असे वादग्रस्त वक्तव्य टीव्हीवरील एका मराठी कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी केले होते.नितीन गडकरींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्याच पक्षाने दिलेल्या आश्वासनांची आपल्या शैलीत खिल्ली उडवली .

तसेच यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘गडकरी खरेच बोलले’ असे ट्विट केले आहे.
गडकरींनी यावर सफाई दिली आहे कि १५ लाखांच्या आश्वासनावर मी बोललोच नव्हतो! मोदी किंवा पंधरा लाखांच्या आश्वासनाबाबत मी या मुलाखतीत काहीच बोललो नाही. राहुल यांना मराठी कळते काय? त्यांनी अगोदर मराठी शिकावे! माझी मुलाखत मराठीत होती. त्यामुळे मी काय बोललो हे राहुल यांना कळले नाही. असे काही बाही सांगून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे . त्यांना मराठी येते काय, असा उपरोधिक सवाल करत गडकरींनी राहुल गांधींनी अगोदर चांगले मराठी शिकून घ्यावे, असा सल्लाही दिला. असा दावाही गडकरींनी केला.

Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *