धनंजय मुंडेंचा सरकारवर सनसनाटी आरोप 

माझा आवाज दाबण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा साम दाम दंड भेद
धनंजय मुंडेंचा सनसनाटी आरोप

नांदेड /प्रतिनिधी – 
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय हा दहा दिवसांपूर्वीचा आहे. जगमित्रा नागा सूतगिरणीत १८  संचालक असताना त्यापैकी सात संचालकांची संपत्ती गोठवण्याचा अहवाल गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीने न्यायालयात सादर झाला. सदरची बाब ही राजकीयदृष्टया प्रेरित आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नांदेड विमानतळवर पत्रकारांशी बोलताना केला.परळी सत्र न्यायालयाने संत जगमित्र नागा सूतगिरणीकडे थकीत असलेल्या करोडो रुपयांच्या कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह सात संचालकांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांचे घर, सूतगिरणीचे कार्यालय व विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तेचा यापुढे व्यवहार करता येणार नाही. तसेच लाभ घेणार नाही, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले. याबाबत धनंजय मुंडे म्हणाले, की संत जगमित्रा नागा सूतगिरणीस १९९९  मध्ये दहा कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. व्याजासह ११  कोटी रुपये कर्जाची परतफेड केली. मधल्या काळात बॅकांच्या शाखा बंद पडल्याने कर्ज भरता आले नाही. पोलिसांच्या अहवालावरून न्यायालयाने जो निर्णय दिला, १८  पैकी ७  संचालकांची संपत्ती गोठवण्याचा निर्णय हा राजकीय हेतूने घेण्यात आलेला आहे. या प्रकरणात अद्याप आम्हाला न्यायालयाकडून नोटीस प्राप्त झालेली नाही. आमचे म्हणणे न्यायालयात सादर करता आलेले नाही, ते मांडण्याची संधी दिली नाही. त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक आहे. याबाबत त्याच न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत. सूतगिरणी ही सहकारी म्हणजे, सरकारची आहे. सरकारी कायद्यानुसार कलम 88 प्रमाणे कारवाई व्हायला हवी होती. सर्व संचालकांना कर्जाची रक्‍कम विभागून द्यायला हवी होती. त्यानंतर संचालकांच्या संपत्तीबाबत निर्णय व्हायला हवा होता. यामध्ये कलम ८८  प्रमाणे कारवाईचे पालन झालेले नाही, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.मी संचालक २००६  झालो. कर्ज १९९९  मध्ये घेतले होते. मी एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचा संचालक आहे. उर्वरित सर्व संचालक हे भाजपचे आहेत. जाणीवपूर्वक विरोधीपक्ष नेता म्हणून सरकारच्या विरोधात आवाज उठवित राहतो. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न अशा कारवायांच्या माध्यमातून केला जाता आहे.

Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *