दुरून डोंगर साजरे , पंकजा मुंडेंचा सवता सुभा,सावरगावात होणार सभा 

पंकजाकृत भगवानबाबा स्मारकाचे दसऱ्याला लोकार्पण


बीड /प्रतिनिधी 

दरवर्षी दसरा मेळाव्या निमित्त नामदेवशास्त्री विरुद्ध पंकजा मुंडे असा रंगणारा भगवानगडाचा वाद आता शमण्याची चिन्हे असून दुरून डोंगर साजरे म्हणत पकंजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असलेल्या संत भगवानबाबा यांच्या श्रीक्षेत्र सावरगाव (घाट) या जन्मगावी गुरुवारी (दि. १८) दसऱ्याच्या निमित्ताने मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी  भगवानबाबांच्या स्मारकाचे लोकार्पण होणार  आहे. ‘एक दिवस एकीसाठी, लोकनेत्याच्या लेकीसाठी’ असा नाराच पंकजाकृत दसरा कृती समितीने दिला आहे.
    भगवानबाबा यांची कर्मभूमी आणि समाधी असलेल्या भगवान गडावर दरवर्षी दसरा मेळावा घेण्याची परंपरा आहे. परंतु, गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी विरोध केल्याने ही परंपरा खंडित झाली आहे. त्यामुळे  पकंजा मुंडे यांनी भगवानबाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथे मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीच्या मेळाव्यात भगवानबाबा यांच्या जन्मगावी भव्य स्मारक उभारण्याची घोषणा पकंजा मुंडे यांनी केली होती. वर्षभरात स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे आले असून दसऱ्याला सकाळी ११ वाजता या स्मारकाचे लोकर्पण होणार असल्याची माहिती माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी हेमंत धात्रक, आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सागंळे, डी. पी. आव्हाड, सुहास कांदे, ॲड. पी. आर. गिते, जगन्नाथ भाबड, दिगंबर गिते आदी उपस्थित होते.
       सावरगावमध्ये १२ एकर जागेत भगवानबाबा यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचन करणारे भगवानबाबा या स्मारकात दिसणार आहेत.अशी माहिती स्मारक कृती समितीने दिली आहे.
Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *