जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांचे निधन

वसमत  /प्रतिनिधी 

हैदराबाद मुक्ती संग्राम आंदोलनातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वोदय परंपरेचे अग्रणी म्हणून ओळखले जाणारे डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांचे आज वसमत (जि. हिंगोली) येथील निवासस्थानी निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. वसमत येथे १९२३ मध्ये जन्मलेल्या गंगाप्रसाद अग्रवाल यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या योगेश्वरी विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतले व त्यानंतर वर्धा येथील बियाणी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. याच दरम्यान त्यांच्यावर महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव निर्माण झाला होता.
Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *