चीनची आर्थिक वाढ मंदावली , जीडीपी घटला

अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या ट्रेड वॉरचे चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम


लोकपत्र ऑनलाईन :


२००८ च्या जागतिक आर्थिक मंदीनंतर चीनची आर्थिक वाढ पहिल्यांदाच मंदावली आहे. चीनने जुलै-सप्टेंबर तिमाहीत 6.5टक्के इतक्या विकासदराची नोंद केली आहे.तिसऱ्या तिमाहीत सर्वांत कमी आर्थिक वाढ झाल्याचं, चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून आलं आहे.रॉयटर्सने चीनचा जीडीपी 6.6टक्के, राहील असा अंदाज व्यक्त केला होता. या अंदाजापेक्षाही प्रत्यक्षातील विकासदर कमी झाला आहे.अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या ट्रेड वॉरचे चीनच्या अर्थव्यवस्थेवर काही महिने परिणाम दिसतील, असं सांगितलं जात आहे.शुक्रवारी प्रसिद्ध झालेली आकडेवारी लक्षात घेतली तर चीनची 2009च्या पहिल्या तिमाहीनंतरची ही सर्वांत खराब कामगिरी राहिली आहे.याआधीच्या तिमाहीत चीनच्या अर्थव्यवस्थेने 6.7 टक्के वाढ नोंदवली आहे. त्यापेक्षा या तिमाहीचे आकडे कमी आहेत. पण चीन सरकारच्या वार्षिक अंदाजाइतकाच (6.5 टक्के) हा विकासदर आहे.

Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *