मनोरंजन

मालवणमध्ये आढळला जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगटाचा तरुण

जगात अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ हा रक्तगट असलेला एक तरुण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या रेवाताळे येथे आढळून आला आहे.पंकज गावडे असे या तरुणाचे नाव आहे.तीन कोटींमध्ये एक तोही फक्त महाराष्ट्रात,आणि मुंबई तसेच कोकण परिसरात हा जगावेगळा रक्तगट आढळून येतो,या रक्तगटाच्या शोध केईएम रुग्णालयातील डॉ. वाय. एम. भेंडे यांनी १९६२ मध्ये लावला होता. ‘अँटीजन एच’ या घटकामुळं हा रक्तगट इतर गटांपेक्षा वेगळा ठरतो. ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ सर्वदाता आहे,मात्र त्याला अन्य कोणत्याच गटाचे रक्त चालत नाही.