गोवंडी मनपा शाळेत 56 विद्यार्थांना विषबाधा, चांदणी शेख या विद्यार्थिनीचा मृत्यू

 

गोवंडी, 10 ऑगस्ट : गोवंडीच्या शिवाजीनगरमधील पालिकेच्या संजय नगर महापालिका उर्दू माध्यमातील शाळेत दिल्या जाणाऱ्या औषधातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चांदणी साहिल शेख या विध्यार्थीनीचा यात मृत्यू झाला आहे. तर अनेक विद्यार्थ्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. यात विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेबाहेर आपला राग व्यक्त केला. यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. आणि जमावाला पांगवण्यात आलं.

Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *