‘एसटी कर्मचारी वेडे झालेत ‘ – दिवाकर रावतेंचे वादग्रस्त विधान

लोकपत्र ऑनलाईन :


दिवाकर रावतेंनी वादग्रस्त विधान केले आहे .औरंगाबाद येथे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी कर्मचा-यांच्या पगारवाढीबाबत वादग्रस्त विधान केलं. दिवाकर रावतेंनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढवले आहेत की ते वेडे झाले आहेत असं वादग्रस्त विधान दिवाकर रावतेंनी केलं आहे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी बेताल वक्तव्य करत एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ज्यांच्या खांद्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याची भिस्त आहे, त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य केल्यानं वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत.

‘पुढची २५ वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही, असं म्हणत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी  त्यावेळी धुडकावून लावली होती.

तर पगारवाढीसंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा कामबंद आंदोलन केलं आहे. भंडारा, सांगली, औरंगाबाद, मुंबई, पुणे इथे अनेगदा पगारवाढीसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केलेली पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांची मान्य नव्हती.हंगामी कर्मचारी म्हणून २५ टक्के पगारवाढ द्यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. तसेच ही पगारवाढीची मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यावेळी देण्यात आला होता. त्यामुळे पगारवाढी जरी झाली असली तरी त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा संप पुकारल्यामुळे आणि त्यात आता परिवहन मंत्र्यांचं हे वक्तव्य यामुळे कर्मचाऱ्यामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी प्रमुख  मागण्या  केल्या होत्या :

  • एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
  • पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी
  • जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना २५ टक्के हंगामी वाढ देण्यात यावी

 

Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *