आईची शप्पथ ‘घातली तरी ‘वाढीव आवाज’ होणार नाही 

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीवर बंदी

मुंबई / प्रतिनिधी :
‘आवाज वाढीव डीजे तुला आइची शपथ हाय’ असे म्हणत गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टमवर बेधुंद होऊन नाचण्याच्या हिडीस प्रकाराला पायबंद घालण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीवर बंदी घालत मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. सण येत जात राहतील, पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, असे  हायकोर्टाने सुनावले . यामुळे यंदा विसर्जन मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांचा दणदणाट पाहायला मिळणार आहे. गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टमचा वापराला मुंबई हायकोर्टाने   नकार दिला आहे. सण येत जात राहतील, पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही.या मुळे नागरिकांना तसेच विद्यार्थी,वयोवृद्ध आणि रुग्णांना त्रास होतो असे न्यायालयाने म्हटले आहे .  या प्रकरणी राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *