अस्वस्थ शांततेच्या शेवटाचा प्रारंभ

ऑगष्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचा
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेला कालचा
महाराष्ट्र बंद तुरळक अपवाद वगळता शांततेत पार पडला. मराठा क्रांती
मोर्चाचे आंदोलक,पोलीस,प्रशासन आणि नागरिकांनी या राज्यव्यापी
बंदला उस्फूर्त प्रतिसाद दिला. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये,
खाजगी कंपन्या, आस्थापना, एसटी महामंडळ,बाजारपेठा, खाजगी
व्यापारी आणि उद्योजक, छोटे-मोठे दुकानदार, मॉलचालक,
वाहतूकदार, चित्रपटगृह चालक, हॉटेल्स, अशा सर्वानीच बंदच्या
काळात सहकार्य,सामंजस्य आणि समन्वयाची भूमिका ठेवली.
आंदोलकांनी संयम राखला.शांततेच्या मार्गाने बंद पाळण्याचा दिलेला
शब्द निभावला, याबद्दल आंदोलकांचे अभिनंदन आणि आभार, कुठे
काही अनपेक्षित घडले असेलही,परंतु एकूण बंद शांततेत पार पडला ही
समाधानाची बाब आहे. मराठा समाज अस्वस्थ आहे. त्यांच्या संयम
आणि सहनशीलतेचा अंत झाला आहे.सरकार फक्त ओशासनाची
टोलवा टोलवी करत आहे.आरक्षण कायद्याच्या आणि न्यायालयाच्या
कात्रीत फसले आहे हे आंदोलक आणि मराठा समाजालाही कळते, परंतु
किमान कबूल केलेल्या अन्य सवलती आणि अभिवचनांची पूर्ती
सरकारने या पूर्वी केली असती तर ही वेळ आली नसती.वेळ अजूनही
गेलेली नाही.मराठा आरक्षणाचा निकाल नोव्हेंबर मध्ये काय लागायचा
तो लागेल.कदाचित आरक्षणाचा तिढा राज्यात सुटणारही नाही. त्यासाठी
संसदेत घटनादुरुस्ती विधेयक मांडून आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी
लागेल.परंतु मुख्यमंत्र्यांनी हे सत्य मराठा समाजाला उघडपणे सांगितले
पाहिजे.दुसरीकडे मराठा समाजाला दिलेल्या इतर सेवा सुविधा आणि
सवलतीच्या ओशासनांची तातडीने परिपूर्ती केली पाहिजे. याबाबत
आता अधिक कालापव्यय केला,चालढकल किंवा दुर्लक्ष केले तर
सरकारला ते महागात पडू शकते. कारण कालचा बंद हे मराठा
समाजाच्या शांतता आणि संयमाचे शेवटचे टोक आहे.इथे मराठा
समाजाला शांत करण्यात आणि त्यांचा विेशास कमावण्यात सरकारने
दिरंगाई केली तर महाराष्ट्रात अराजक निर्माण झाल्याशिवाय राहणार
नाही. त्यामुळे हा शांततेच्या शेवटचा विराम नसून प्रारंभ आहे हे मुख्यमंत्री
आणि त्यांच्या पक्षाने लक्षात घेतले पाहिजे. मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर
पेटणार्‍या आगीची, तोडफोडीची आणि पडझडीची चिंता वाटते, परंतु
मराठा समाज आतून किती जळतोय, अंगारातून चालतोय,पदोपदी
आडतोय, नडतोय, हे मुख्यमंत्र्यांना दिसत जाणवत नाही काय? मराठा
समाजाची आतून बाहेरून किती पडझड झाली आहे,पाया खचलाय,
भिंती कलल्यात,खांब कोसळलेत…मराठा समाज आतून बाहेरून
उद्ध्वस्त झालाय. हजारो वर्षे ज्यांनी घाम गाळून महाराष्ट्र पोसला, रक्त
सांडून राखला,त्यांचीच आता उपासमार होत आहे,मराठ्यांची तारणीबांड
पोरे आत्महत्या करत आहेत. ही परिस्थिती एका भयाण अशांततेतेकडे
जाणारी आहे.अजूनही वेळ गेलेली नाही. मराठ्यांचा विद्रोह शांत करा
अन्यथा आजचा शांततेचा बंद या पुढे उग्र स्वरूप धारण करू
शकतो. मग जो आगडोंब आणि वणवा पेटेल तो विझवणे शयय
होणार नाही. त्

Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *